आसू वार्ताहर/आनंद पवार
आसू गावामध्ये कोरोना कमिटी व ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कोरोना साठी उपाय योजना करून कोरोनाचा प्रादुर्भाव व दक्षता घेण्याचे कामही केले आहे गावातील नागरिकांसाठी अर्सनिक अल्बम ३० चे वाटप करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत युवानेते श्रीमंत श्रीमंत धीरेंद्र राजे खर्डेकर यांनी व्यक्त केले
आसू ग्रामपंचायत व माऊली क्लिनिक यांच्या सहकार्याने आसूतील दीड हजार कुटुंबांना मोफत अर्सेनिक अल्बम 30चे मोफत वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी सरपंच महादेवराव सकुंडे, उपसरपंच नितीन गोडसे , जीवन पवार ,धनंजय घोरपडे ,खाजू शेख,ज्ञानदेव भोसले, जमीर महात, मुन्ना शिरतोडे, माऊली क्लिनिक चे डॉक्टर संतोष जाधव माऊली मेडिकलचे अनिल घाडगे व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या
आसू गावात कोरोना बाबत महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत औषध फवारणी वेळोवेळी सूचना देण्याचे काम व ग्रामस्थांसाठी महत्त्वाचे नियमांचे पालन करण्यासाठी उपाय योजना असे महत्त्वपूर्ण काम केले आहे पंचायत समिती सभापती शिवरुपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व समस्या साठी प्रयत्नशील असल्याचे मत हि श्रीमंत धिरेंद्रराजे यांनी सांगितले
अर्सनिक अल्बम 30 चे सेवन करणे आरोग्यास लाभदायकअसून त्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते याचा लाभ सर्वांनी घ्यावा प्रत्येकाने तीन दिवस ह्या गोळ्या घ्यायच्या असून त्यातून शरीराला कसलाही त्रास होणार नसल्याचे यावेळी माऊली क्लिनिकचे डॉक्टर संतोष जाधव यांनी सांगितले यावेळी आशा स्वयंसेविका ना अर्सनिक अल्बम 30 चे मोफत वाटप करण्यात आले