बारामती: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑटो सॅनिटायझर मशीन चे वाटप शहर पोलीस स्टेशन,गुणवडी ग्रामपंचायत, भारतीय आयुर्विमा कार्यालय बारामती शाखा या ठिकाणी करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या काळात हात धुण्यासाठी सहज सॅनिटायझर चा वापर करता या साठी सदर मशीन भेट देत असल्याचे भारतीय आयुर्विमा महामंडळ चे शतकवीर विमा प्रतिनिधी महादेव आगवणे यांनी सांगितले.या प्रसंगी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,गुणवडी ग्रामपंचायत च्या सरपंच सरस्वती गावडे, उपसरपंच सुनील गावडे सदस्य अमर मुरूमकर,राजेंद्र गावडे,ग्रामसेवक मछिनद्र आटोळे, सामाजिक कार्यकर्ते सतपाल गावडे,विकास अधिकारी सुनील जोगळेकर,वरिष्ठ शाखा अधिकारी संतोष पालकर आदी उपस्तीत होते. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे ” पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.”सामाजिक भान व जाण ठेवत महादेव आगवणे यांनी गुणवडी च्या नागरिकांसाठी केलेल्या कार्य म्हतपूर्ण आहे” असे ग्रामपच्यात च्या वतीने सांगून आभार व्यक्त करण्यात आले. सोशल डिस्टनिग चे पालन करीत सदर कार्यक्रम संपन्न करण्यात आले.महादेव आगवणे यांनी प्रास्ताविक केले व सुनील जोगळेकर यांनी आभार व्यक्त केले.
फोटो ओळ: पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या कडे मशीन सुपूर्द करताना महादेव आगवणे,सुनील जोगळेकर व इतर