फलटण तालुक्यातील गॅस सिलेंडर ग्राहकांच्या शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे आलेल्या तक्रारीनुसार गॅस एजन्सींकडुन ग्राहकांना घरपोच सिलेंडर देणे बंधनकारक असतानाही तो घरपोच दिला जात नाही. आठवड्यातुन ठराविक दिवशी गॅस एजन्सींकडुन गावागावात सिलेंडर दिले जातात. परंतु ते घरपोच न देता एखाद्या दुकानात ठेवले जातात. त्याच ठिकाणी ग्राहकांना गॅस एजन्सींनी दिलेले कार्ड व रिकामे सिलेंडर व पैसे ग्राहक जमा करायला सांगितले जाते. याठिकाणी सदर दुकानदार मग त्याचा मोबदला म्हणुन ग्राहकांकडुन प्रत्येकी 10 रुपये घेतात. तर गॅस एजन्सींकडुन ग्राहकांना गावागावात सिलेंडर पोहोचवण्यासाठीचे वाहतुकीचे पैसे ग्राहकांकडुन घेतले जातात. हे साफ चुकीचे आहे. नियमांना धरुन नाही. शासनाच्या व गॅस कंपनीच्या सिलेंडर घरपोच योजनेला पुर्णपणे हरताळ फासला जात असुन यामध्ये ग्राहकांची आर्थिक लुट होत आहे. अशा विषयाचे लेखी पत्र फलटण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना समक्ष शिवसेनेच्यावतीने शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिलेले आहे. त्यावेळी सोबत दुसरे तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक, शहर प्रमुख रणजित कदम, उपशहर प्रमुख राहुल पवार व माऊली कदम उपस्थित होते.
शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी पत्रात पुढील उल्लेख केल्याप्रमाणे ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतर सिलेंडर दोन दिवसात घरपोच करणे गॅस एजन्सींना बंधनकारक असताना एजन्सींकडुन आठवड्यातुन ठराविक दिवशी गावातील एखाद्या विशिष्ट ठराविक ठिकाणी सिलेंडर पोहोच केले जातात. त्यामुळे ग्राहकांना आवश्यक आहे त्यावेळी सिलेंडर उपलब्ध होत नाही व त्यांना गोडावुनला धडक मारुन स्वतः प्रवास करुन व वेळ वायाला घालवुन सिलेंडर आणावा लागतो. ग्राहकांनी स्वतः गोडावुनमधुन सिलेंडर आणल्यानंतर गॅस सिलेंडरच्या रकमेतुन काही किरकोळ ठराविक रक्कम ग्राहकांना परत देणे बंधनकारक असताना ती दिली जात नाही. अशी माहिती शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी पत्रात दिलेली आहे.
शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी स्पष्टपणे सांगितले की गॅस सिलेंडर घरपोच व्यवस्था म्हणजे थोडक्यात ग्राहकांनी सिलेंडर घेण्यासाठी गोडावुनमध्ये यायचेच नाही. परंतु गॅस एजन्सींकडुन या नियमाला पुर्णपणे हरताळच फासल्याचा दिसत आहे व यामुळे ग्राहकांची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांचेकडे केलेली आहे. तसेच ग्राहकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी फलटण तालुक्यामध्ये गॅस सिलेंडर पुरवठा करणा-या सर्व गॅस एजन्सींना एकत्र बोलावुन या विषयावर व्हिडिओ रेकाॅर्डींगमध्ये एक मिटींग आयोजित करुन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी प्रांताधिकारी फलटण यांना समक्ष दिलेल्या लेखी पत्राद्वारे सुचवले आहे. तसेच ग्राहकांना यामध्ये न्याय मिळाला नाही, तर शिवसेना आपल्या स्टाईलने लाॅकडाऊन असतानाही रस्त्यावर उतरुन आंदोलन करेन असा आक्रमक इशारा दिलेला आहे.
ग्राहकांना घरपोच सिलेंडर देत असताना तो वजनकाटा करुन देणे गॅस एजन्सींना बंधनकारक आहे. तसेच गॅस एजन्सींकडुन नविन गॅस कनेक्शन घेत असताना तेथुनच गॅस शेगडी विकत घेण्याचे बंधन ग्राहकांना नाही. ते जिथे माफक दरात गॅस शेगडी उपलब्ध होईल तेथुन ते विकत घेऊ शकतात. त्यावर एजन्सी बंधन घालुन ग्राहकांकडुन जास्त पैसे घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट सांगितले व फलटण तालुक्यातील ग्राहकांनी याबाबत जागरुक रहावे असे आवाहनही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व आदी शिवसेना पदाधिका-यांनी केले आहे.
*धन्यवाद..जय महाराष्ट्र*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*आपला नम्र जनसेवक :*
*प्रदिप हरिभाऊ झणझणे,*
*शिवसेना फलटण तालुका प्रमुख,*
*शिवसेना जनसंपर्क कार्यालय सासवड, ता.फलटण,*
*संपर्क क्रमांक : 8600138961, 7774096430.*