कोरोना च्या लढ्यात पुणे आयकर आयुक्त आणि सुरवङी गावंचे सुपुञ तुषार मोहिते मैदानात

कोरोना च्या लढ्यात पुणे आयकर आयुक्त आणि सुरवङी गावंचे सुपुञ तुषार मोहिते मैदानात उतरले असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये    जीवनावश्यक वस्तूंच्या  किट ,  अर्सेनिक अल्बम ३० चे वितरणसह अनेक उपक्रमाद्वारे त्यांनी दिला गरजूंना मदतीचा हात
    सुरवडी, नांदल, खराडवाडी, डोंबाळवाडी,संगमनगर,धुळदेव,निरगुडी, मांडवखडक, दालवडी,  संगमनगर दुधेबावी आदी गावातील येथील हजारो  कुटुंबांना पुणे आयकर आयुक्त तुषार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तू किट ,  आरोग्यरक्षक अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप आदी उपक्रमांद्वारे  कुटुंबांना मदत करण्यात आली.
*गोरगरीब यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून उपाययोजना*
             करोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरु असलेल्या विविध उपाय योजनांपैकी लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा सामना करताना या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सुरवडी, नांदल, खराडवाडी, डोंबाळवाडी,संगमनगर,धुळदेव,निरगुडी, मांडवखडक, दालवडी, दुधेबावी आदी गावातील हजारो कुटुंबांना आयकर आयुक्त पुणे तुषार मोहिते कुटुंबीय आणि या गावातील होतकरु तरुणांनी प्रामुख्याने सागर भोसले, स्वप्नील मोहिते, सनी जाधव, युवराज जाधव, महेश जाधव, सूर्यकांत मोहिते, संदीप कांबळे, केशव जाधव या तरुणांनी आयकर आयुक्त तुषार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला.
*घरातच रहा, सुरक्षीत रहा*
     करोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत घाबरुन न जाता गावातील अत्यंत बिकट परिस्थितीत असलेल्या कुटुंबांना मदत करा, आपत्ती काळात घरातच राहुन कुटुंबाची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा, अगदी घराबाहेर पडावेच लागले तर मास्क वापरा, सुरक्षीत अंतर ठेवून काम होताच लगेच घरी पोहोचा सुरक्षीत रहा असे आवाहन यावेळी आयकर आयुक्त मोहिते यांनी ग्रामस्थांना केले.
*आपले, कुटुंबाचे, गावाचे आरोग्य सांभाळा*
        करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावातील लोक निरोगी आणि या आजारापासून दूर राहिले पाहिजेत यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला अर्सेनिक अल्बम ३० या आयुर्वेदिक औषधाची एक बाटली मोफत दिली आहे, त्याचा योग्य वापर करुन आपले, कुटुंबाचे
व गावाचे आरोग्य अबाधीत राखण्यास सहकार्य करा असे आवाहन यावेळी आयकर आयुक्त तुषार मोहिते यांनी केले आहे.
*उपक्रमाबद्दल धन्यवाद*
     मोहिते कुटुंबीय व तरुणांच्या प्रयत्नाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत आयकर आयुक्त मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.
*फोटो* : आयकर आयुक्त तुषार मोहिते जीवनावश्यक वस्तू किटचे वितरण करताना शेजारी गावातील तरुण वर्ग आणि लाभार्थी ग्रामस्थ.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!