तिरुमाला दुध प्रकल्पावर कारवाई करा,शिवसेनेची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी

फलटण प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील दोन कारखान्यांनी लोकांचे कोट्यवधी रुपये दिले नसल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता अनेक दूध डेअरीच्या चालक मालकांनी त्यांच्या दुधाचे पैसेच गेली दोन महिने झाले दिले नाहीत ही बाब समोर आली असून या मध्ये स्वराज दूध प्रकल्प घेतलेल्या तिरुमाला डेअरीने लाखो रुपये थकवले असल्याची तक्रार शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून ताबडतोब दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे द्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
      दोन महिने पुर्ण होऊन गेले तरी अजुनही दुधाचे त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले नसल्याच्या काही दुध उत्पादक शेतक-यांच्या तक्रारी शिवसेनेकडे करण्यात आलेल्या आहेत .याबाबत तिरुमालासाठी दुध गोळा करणा-या दुध संकलन करणा-या केंद्र चालकाला शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी विचारणा केली असता त्यांनी दुध उत्पादक शेतक-यांना त्यांच्या दुधाच्या पैशाचे वाटप करण्यासाठी निंभोरे येथील तिरुमाला दुध प्रकल्प कार्यालयातुन आमच्याकडे पैसे आले नसल्याचे सांगितले.  
     तिरुमाला दुध प्रकल्पाचे व्यवस्थापक आशिष काळबंडे यांचेशीही पदाधिकारी यांनी संपर्क साधला असता त्यांना सध्याचे लाॅकडाऊन प्रकरण व त्यामध्ये शेतकऱ्यांची झालेली आर्थिक अडचण असल्याची बाब सांगितली. त्यानंतर फलटण तालुक्यातील दुध उत्पादक शेतक-यांची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.सुनील केदार यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता सदर दुध प्रकल्पावर योग्य ती कार्यवाही करुन दुध उत्पादक शेतक-यांना व दुध संकलन करणा-या चालकांना सर्व पेमेंट लवकरात लवकर देण्यासंबंधी मागणी केलेली आहे. तसेच इथुन पुढेही शेतक-यांना वेळेवर पेमेंट देण्यात यावे यासाठीचीही मागणी फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.सुनील केदार व फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी फलटण तालुक्यातील दुध उत्पादक शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे ठाम आश्वासन दिले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!