पत्रकारांसाठी शासनाने 50 लाखाचे विमा कवच द्यावे

प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देताना जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ,अरविंद मेहता,प्रा.रमेश आढाव व इतर पत्रकार

फलटण  –  कोरोना साथीच्या संदर्भात काम करताना शासनाच्या सेवेत कर्मचार्‍यांचा, अधिकार्‍यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 50 लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे त्यानुसार पत्रकारिता विमा संरक्षण असावे या मागणीचे निवेदन फलटण शहर व तालुका संपादक व पत्रकार यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना देण्यात आले आहे.
दिनांक 28 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार कोरोना साथीच्या संदर्भात काम करताना शासनाच्या सेवेत कर्मचार्‍यांचा, अधिकार्‍यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 50 लाखाचे विमा कवच जाहीर केले आहे. शासकीय कर्मचारी, विविध आरोग्य सेवा कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्याबरोबरीने या कोरोना साथीसाठी वार्तांकन, लोकजागृती यासाठी धाडसाने पत्रकार काम करत आहेत. शासन निर्णयातील वरील संवर्गामध्ये असे काम करणारे पत्रकार यांचाही समावेश करावा अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ व फलटण शहर व तालुका संपादक व पत्रकार  यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांच्या मार्फत पाठवण्यात आलेले आहे. हे निवेदन देताना जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा.रमेश आढाव, नसिर शिकिलगार,युवराज पवार, यशवंत खलाटे(पाटील), बाळासाहेब ननावरे, सुधीर अहिवळे, रोहित अहिवळे, किरण बोळे, प्रसन्न रूद्रभटे, विक्रम चोरमले, प्रा. सतीश जंगम, सतीश कर्वे, अशोक (शक्ती) भोसले, सचिन मोरे,मयूर देशपांडे, शेखर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देताना जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ,अरविंद मेहता,प्रा.रमेश आढाव व इतर पत्रकार
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!