फलटण प्रतिनिधी – येथील रिंग रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून ते वाहन व वाहनचालक फरार झाल्याची घटना घडली आहे.
या बाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातुन दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार दि.28 मे रोजी रात्री 11 च्या दरम्यान नाना पाटील चौक ते दहिवडी चौक(पृथ्वी चौक)या दरम्यान कुसूम किसनराव बिडकर वय 70 राहणार हडको कॉलनी फलटण ही वृद्ध महिला रस्ता क्रॉस करीत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली व गाडीचालक पसार झाला आहे.त्या अज्ञात वाहनाची ओळख पटली नसून पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक बनकर करीत आहेत. सुरवातीला या वृद्ध महिलेची ओळख पटली नव्हती या जखमी महिलेस उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते याठिकाणी या वृद्ध महिलेचे निधन झाले होते. मृत्यूनंतर या वृद्ध महिलेचा शोध घेतला असता शोध लागला.