पोपटराव बर्गे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

फलटण : आण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन अंदोलन न्यासाचे फलटण तालुका संघटक, प्रतापगड उत्सव समिती, गोरक्षक दलाचे प्रमुख,  मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राहुल उर्फ पोपटराव बर्गे यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. 
पोपटराव बर्गे हे गेली 21 वर्षे सामाजिक माध्यमातून विविध प्रश्‍न सोडविण्यात ते पुढे कार्यरत असतात. प्रतापगड उत्सव समिती व आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन अंदोलन समिती, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष फलटण, नवदुर्ग गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यात ते सदैव अग्रभागी असतात. ऐतिहासिक घडामोडींचे वाचन व संशोधन याची त्यांना विशेष आवड असून यातून नुकतेच त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजचिन्हे व अजरामर शस्त्रे’ ही पुस्तक निर्मितीही केली आहे. एक दुर्ग प्रेमी म्हणून युवकांसाठी किल्ले स्पर्धा, किल्ले संतोषगड येथे विविध उपक्रम ते सातत्याने आयोजित करीत असतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. 
आगामी काळातही सार्वजनिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत राहून समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींच्या न्यायहक्कासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे पोपटराव बर्गे यांनी सांगीतले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!