जिल्ह्यातील 17 नागरिकांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह; मृत्यू पश्चात तिघांच्या घाशातील स्त्राव पाठविले तपासणीला

 सातारा दि. 1  (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले  आहेत. तसेच  मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वॉरंटाईन असेलल्या बोपेगांव ता.  वाई येथील रक्त दाबाचा त्रास असलेल्या  85 वर्षीय महिला. सारीचा आजार असलेली गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिला तर 15 वर्षापूर्वी कॅन्सरने आजारी असलेला 29 मे रोजी  मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा 3 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पश्चात त्यांच्या घाशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

बाधित रुग्णांमध्ये   फलटण तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, वडाळे येथील 35 वर्षीय पुरुष.

                जावळी तालुकयातील  कावडी येथील 52 वर्षीय महिला, कळकोशी येथील 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील 39 वर्षीय महिला.

                कराड तालुक्यातील  विंग येथील  43 वर्षीय महिला,  19 वर्षीय तरुण.

                पाटण तालुक्यातील काळेवाडी येथील 21 वर्षीय  महिला, नवसरेवाडी  येथील 25 व 22 वर्षीय पुरुष.

                खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 72 वर्षीय महिला.

                खटाव तालुक्यातील  अंभेरी येथील 3 व 6 वर्षीय बालीका, 29 वर्षीय पुरुष.

                महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 53 वर्षीय महिला, गोरोशी येथील 72 वर्षीय महिला.

                वाई ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवक.              

                                                                          

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!