शिस्तप्रिय व दर्जेदार विद्यार्थी घडवणारे एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जाणारे प्राचार्य हंकारे सर आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या कार्याचा आढावा…

मागील काही वर्षांपूर्वी ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी भाग शाळा आसू या ठिकाणी उपप्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारली व येथील शाळेला शिस्त लावण्याची जणूकाही शपथ घेतली असे व्यक्तिमत्त्व समोर आले ते म्हणजे प्राचार्य हंकारे सर
ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी आसू याठिकाणी सरांनी उपप्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला व शाळेला शिस्त लावण्यापासून ते शाळेचा परिसर निसर्गरम्य करून विद्यार्थी घडविण्यात पर्यंत त्यांनी आपले मोलाचे कार्य केले.
       सर त्यांचे कार्य करत असताना आम्ही सुद्धा याच शाळेत शिक्षण घेतले व हंकारे सरांच्याच मार्गदर्शनाखाली घडलो आम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना नेहमीच पहायचो की सरांचे नेहमी विद्यार्थ्यांकडे शाळेतील झाडांकडे व शिक्षकांकडे वैयक्तिक लक्ष असायचे मात्र आपली शाळा निसर्गरम्य कशा पद्धतीने करता येईल या गोष्टीचा सर नेहमीच विचार करत असत व त्या अनुषंगाने सर्व प्रयत्न करत आसू शाळेचा परिसर हा निसर्गरम्य केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत खूप झाडांची लागवड करण्यात आली विविध वेगवेगळ्या झाडांची लागवड तसेच शाळेत गार्डन अशा या पद्धतीने सरांनी वृक्षारोपण केले व शाळेच्या पूर्णतः कायापालट करून सोडला.
       सरांनी शाळेकडे शाळेतील झाडांकडे जसे लक्ष दिले तसेच विद्यार्थ्यांकडे देखील मोठ्या प्रमाणात लक्ष दिले विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवणे काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवणे विद्यार्थीवर्गाला शाळेच्या परिसरात कोणत्याही गोष्टींची कमी न पडुन देता शाळेतील परिसर स्वच्छ ठेवणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बाथरूमची व्यवस्था व स्वच्छता या सर्व गोष्टींकडे सरांचे बारकाईने लक्ष असत तसेच शाळेत पालक सभेचे नियोजन करणे व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी या पालक सभेच्या माध्यमातून सोडवणे.
      सर खूप शिस्तबद्ध व शिस्तप्रेमी असल्याने विद्यार्थ्यांना शिस्त लावणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. हंकारे सर आले म्हणलं की मुलांची पळापळ होत असे व सर्व मुले कटाक्ष पणे शिस्तीचे पालन करत असे सरांचा   शिस्तीच्या बाबतीत एक वेगळाच दरारा निर्माण झाला होता. आसू शाळा परिसर पाहिला की हंकारे सरांच्या याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
हंकारे सर हे कडक स्वभावाचे असले तरी मनाने मात्र खूप प्रेमळ स्वभावाचे असल्याचे पाहायला मिळते पण तरीसुद्धा हंकारे सर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते व या भीतीपोटी विद्यार्थ्यांना शिस्तीची सवय लागत. आम्ही देखील हंकारे सरांकडे आसू येथील शाळेत शिकलो यानंतर आम्ही येथील शाळेत दहावीचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर हंकारे सरांना ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी प्रशालेची प्राचार्य पदाची धुरा सांभाळावी लागली. व नंतर त्यांना फलटण येथील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण या प्रशालेची प्राचार्य पदाची धुरा सांभाळावी लागली सरांनी शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही विद्यार्थी व आसू पवारवाडी ग्रामस्थ शतशः आभारी आहोत.
दर्जेदार विद्यार्थी घडवणारा आदर्श शिक्षक आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांचे सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांना आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
अजित अर्जुन निकम
पत्रकार दै.लोकमत आसू
मो.9730664224

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!