राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंती निमित्त ऑल इंडिया धनगर समाज महासंघ
नवी दिल्ली आयोजित व श्री. राजू बबन लोखंडे (युवक अध्यक्ष,सातारा जिल्हा) यांच्या संयोजनाने घेतलेल्या
राजमाता अहिल्यादेवी होळकर या विषयावर ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेमध्ये,
श्री. गणेश भगवान तांबे यांचा द्वितीय क्रमांक आलेला असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व शिक्षक वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे .स्पर्धेचे बक्षीस रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून अनेक कवीने सहभाग घेतला होता.
या काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण
श्री. राजीव गोविंद रणवीर सर यांनी केले,त्यांचे अनेक काव्यसंग्रह व कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. या स्पर्धेतील मिळालेली रक्कम व यापूर्वीही मिळालेल्या काव्यस्पर्धेची रक्कम कोरोना यौद्धासाठी देणार असल्याचे श्री गणेश तांबे यांनी जाहीर केले.श्री गणेश तांबे हे प्राथमिक शिक्षक असून यांनी यापूर्वीही कोरोना ग्रस्तांसाठी वस्तू स्वरुपात भरघोस मदत केलेली आहे. त्यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सिंहाचा वाटा असतो.
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर या सामाजिक संस्थेच्या वतीने ते विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांच्या या कार्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.