सातारा दि. 31 (जिमाका) : कोरोना केअर सेंटर, खावली येथे दाखल असणाऱ्या खटाव तालुक्यातील निमसोड येथील 20 वर्षीय युवक व 48 वर्षीय पुरुष असे 2 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पुसेसावळी येथील 48 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याने तिचा मृत्युदेह क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे आणून कोविड संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमूना तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात आला आहे तसेच महाबळेश्वर येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या झांजवड गावातील 57 वर्षीय पुरुषाने आत्महत्या केली असून त्याचाही नमुना कोविड तपासणी करीता पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
131 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे 19, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे 9, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 36, शिरवळ येथे 52, कोरोना केअर सेंटर रायगांव येथे 15 असे एकूण 131 घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.