फलटण – हिंगणगाव येथील सूळ वस्ती ता. फलटण या ठीकाणी पोल्ट्री फार्म मूळे माशांचा खूप नाहक त्रास होत आहे. त्या मुळे तेथील लहान मुले व वयोवृद्ध नागरिक सतत आजारी पडत आहेत तर मोठ्या माणसांचे ही आरोग्य धोक्यात आले असून संबंधित पोल्ट्रीफार्म कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.
हिंगणगाव येथील सुळवस्ती लगतच हा पोल्ट्रीफार्म आहे.त्या ठिकाणी स्वच्छता नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात माशा झाल्या आहेत. या माशांच्या त्रासा मूळे दोन वेळचे जेवन सूधा नीट त्या लोकांना खाता येत नाही.माशां मूळे पिकांवर परिणाम होत आहे तर पीके ही नीट येत नाहीत दरम्यान पोल्ट्रीफार्म मूळे त्या भागात ऊंदीर,घुस खूप आहेत आणि हे ऊंदीर व घुशी ऊभी पीके नष्ट करतात या मुळे पिकांचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.
दरम्यान मोठ्या प्रमाणात माशां मूळे छोटी मोठी जनावरे सूद्धा सतत आजारी पडत आहेत.सुळवस्ती येथील २००/ ३०० लोकांना व त्यांच्या लहान मुलांना खूप त्रास होत आहे. या मुळे हे पोल्ट्रीफार्म बंद करण्यात यावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
सतत या माशांच्या प्रादुर्भावामुळे लहान मुले व लोक आजारी पडत आहेत. त्या मुळे सारखे दवाखान्यात जावे लागत आहे.माशांन मूळे जनावरे दूध देत नाहीत व काढलेले दूधात ही खूप माशा पडतात.या माशा पक्षांच्या आंगावर व ईष्टे वर बसून घरात येऊन पदार्था वर बसतात व तेच अन्न खावे लागते या मुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या मुळे हा पोल्ट्रीफार्म बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुळवस्ती हिंगणगाव येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
उन्हाळ्यात पोल्ट्रीमधे पाणी सांडलेस माशा होतात ,पोल्ट्रीत पोगर असेल तर ती बंद करा माशा जातील ,