प्रतिनिधी – फलटण मधील शुक्रवार पेठेतील एक वर्षाहून अधिक दिवस बंद असलेल्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे.
या घरामध्ये सध्या कोणीही वास्तव्यास नसून याचा फायदा घेत केली घरफोडी. या बाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातुन दिलेल्या माहितीनुसार श्रीमती स्नेहलता शरदच्चन्द्र गांधी रा.शुक्रवार पेठ फलटण या गेली एक वर्षे झाले आपल्या मुलीकडे राहतात त्यांच्या तीन मजली घराचे कडी कोयंडा तोडून 28 मे ते 29 मे च्या दरम्यान त्यांच्या घरी चोरी झाली असून या मध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे 160000/- रुपयांची चोरी झाली आहे.प्राथमिक माहितीनुसार ही चोरी ओळखीच्या व्यक्तीने केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेचा अधिक तपास पो. उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.