दुधेबावी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त युवा व्याख्याते नवनाथ कोलवडकर व रविकुमार ठावरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती, पत्रकार अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख निलेश सोनवलकर यांनी दिली.
प्रतिवर्षी संपूर्ण देशभर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जयंती उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. याचअनुषंगाने फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यानाचे आयोजन करुन अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. दि.31 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजता नवनाथ कोलवडकर यांचे व्याख्यान https://www.facebook.com/navnath.kolwadkar.3 या लिंकवर तर याच दिवशी सायंकाळी 6 वाजता रविकुमार ठावरे यांचे व्याख्यान https://www.facebook.com/nilesh.sonwalkar.359 या लिंकवरती सर्वांना ऐकता येणार आहे. तरी या अनोख्या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निलेश सोनवलकर यांनी केले आहे.