फलटण – जगभरात करोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्या नंतर देशभर शासनाने लॉकडाऊन जाहिर केला त्या मुळे छोटे मोठे उद्योग व्यावसाय बंद पडल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या मुळे शासनाने लॉकडाऊन काळातील छोट्या व्यवसायिकांची संपुर्ण विजबिल माफ करावे
गेल्या दिडदोन महिण्या पुर्वी देशात लॉकडाऊन जहीर केला आहे. त्यावेळी पासुन सर्व व्यावहार बंद झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. रोजंदारीव काम करणाऱ्यांची तसेच हातावर पोट असण्याची अवस्था दयनीय झाली आहे. छोटे व्यावसायिक लघुऊद्योजक टपरीधारक करागीर यांच्यावर उपासमारीची वेळी आली आहे. शेतकऱ्यांना तर आपला शेतमाल मातीमोल किंमतीत विकावा लागला आहे काही शेतकऱ्यांना तर आपला शेतमाल शेतातच सोडून द्यावा लागला आहे एकंदर सर्वच नागरिक अडचणीत सापडले असून उद्योग धंदे व्यावसाय बंद पडल्याने त्यांना बिज भरणे शक्य नाही तरी शासनाने वीज बील माफी करावी अशी मागणी केली जात आहे.