भाडळी खुर्द गावात अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे मोफत वाटप

                        
   कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत प्रभावी ठरलेले व आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले *अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे भाडळी खुर्द येथे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,अध्यक्ष,विधान परिषद महाराष्ट्र राज्य,श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर,चेअरमन,कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी अध्यक्ष जि. पण. सातारा,आ.दिपकराव चव्हाण,फलटण-कोरेगाव विधानसभा यांचे मार्गदर्शनाने .
   श्री.सचिन रणवरे, पंचायत समिती सदस्य फलटण व भाडळी खुर्द-बुद्रूक विकास सोसायटीच्या वतीने भाडळी खुर्द गावातील सर्व ग्रामस्थांना मोफत वितरण करण्यात आले.                                   
            यावेळी भाडळी खुर्द गावासह अंतर्गत वाड्या-वस्त्यांवरील सर्व कुटुंबीयांना या औषधाचे मोफत वितरण करून हे औषध घेण्याबाबतची ची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.  
              अडचणीच्या काळात नेहमीच गावातील लोकांच्या मदतीला व समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य म्हणून या अगोदर सुध्दा भाडळी खुर्द-बुद्रूक सोसायटीच्या वतीने मोफत सॅनिटाइजर व साबण वाटण्यात आले होते.
                           हा उपक्रम भाडळी खुर्द-बुद्रूक विकास सेवा सोसायटी यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने सदरचा उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी परिचारिका सौ. चांदगुडे मॅडम, अंगणवाडी ताई, मदतनीस व आशा मॅडम यांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
 यावेळी राजेश बोराटे (चेअरमन),कुमार सोनवलकर (सोसायटी सदस्य),हणमंत सोनवलकर (पोसीस पाटील)अंकुश सोनवलकर (पाटील), शामराव सोनवलकर, स्वप्निल सोनवलकर(ग्रामपंचायत सदस्य), महादेव सोनवलकर, अरूण सोनवलकर ( माजी सरपंच), नारायण डुबल ( माजी चेअरमन), चिंतामणी सोनवलकर ( माजी व्हाईस चेअरमन), तानाजी सरगर,बंडू सोनवलकर, साधू जाधव (माजी ग्रामपंचायत सदस्य) , संतोष सोनवलकर (तंटामुक्तीचे अध्यक्ष), रणजित मोरे, राहुल सोनवलकर, राजेंद्र खरात, अजित बोराटे, अविनाश बोराटे हे उपस्थित होते.
यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून आौषधांचे वितरण करण्यात आले.
जाहिराती साठी संपर्क –
प्रवीण काकडे सर -992-293-1066
राहुल पवार – 966-582-4007

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!