सातारा दि. 29 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारे चिंचणी ता. खटाव येथील 5 व पळशी ता. खंडाळा येथील 1 तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणाऱ्या पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील 53 वर्षीय महिला, ताम्हीणे येथील 25 वर्षीय महिला असे एकूण 8 जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. तसेच कारी ता. सातारा येथील 54 वर्षीय बाधित पुरुषाचा आज मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
86 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्ह्यातील 86 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
257 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 24, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 26, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 93, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 42, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 30 व शिरवळ येथील 42 असे एकूण 257 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 454 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 143 रुग्ण बरे झाले आहेत. तर 295 रुग्णांवर उपचार सुरु असून 16 जणांचा मृत्यु झालेला आहे.