सातारा दि. 29 ( जि. मा. का ): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात, सातारा येथे आज पासून कोविड-19 च्या चाचणीसाठी ट्रूनॅट यंत्र कार्यान्वीत करण्यात आले. याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
ट्रूनॅट यंत्र हे लॅपटॉपच्या आकाराचे असून गरजेनुसार या यंत्राला कुठेही हलविणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळत असल्याने काही जणांची या मशिनद्वारे चाचणी करण्यात येणार आहे. या ट्रूनॅट यंत्रामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.