नगरपालिका हद्द परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र शिथिल, निरस्त करण्याचे आदेश जारी

सातारा दि. 29 (जिमाका) : सातारा शहरातील गेंडामाळ  येथील रहिवासी असणारा एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळला होता. हा रुग्ण उपरोक्त  भागाचा स्थानिक रहिवासी असल्याने सातारा शहरातील गेंडामाळ, सातारा येथील वास्तव्यास असणाऱ्या विलगीकरण सेंटर पॉईंट केंद्रस्थानी धरुन सदरचा परिसर म्हणजेच गेंडमाळ, सातारा नगरपालिका हद्द प्रतिबंधित क्षेत्र म्हणून दि. 22.4.2020 रोजीच्या आदेशानुसार घोषित करण्यात आलेला होता.
उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमारंडर सातारा उपविभाग, सातारा यांनी आज जारी केलेल्या आदेशानुसार सातारा शहरातील गेंडामाळ, सातारा नगरपालिका हद्द हा परिसर केंद्रस्थानी धरुन हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र उठविणे, शिथिल, निरस्त करण्यात आले आहे. तथापि, या निरस्त, शिथिल प्रतिबंधित क्षेत्राबाबत जे सामान्य क्षेत्राबाबत जिल्हाधिकारी यांचेकडील दि. 21 मे 2020 तसेच शासनाकडून प्राप्त होणारे कोरोना बाबतचे आदेश व दिशानिर्देश असतील ते सर्व त्यांच्यावर बंधनकारक राहतील.
जाहिराती साठी संपर्क –
प्रवीण काकडे सर -992-293-1066
राहुल पवार – 966-582-4007

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!