सातारा दि. 29 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील विविध गावांमधील 9 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
म्हासोली ता. कराड येथील 50, 40, 58 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 12 वर्षांची मुलगी, इंदोली येथील 39 वर्षीय पुरुष, भरेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय महिला तसेच मिरेवाडी येथील 23 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 143 जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे