फलटण शहर व फलटण तालुक्यातील सर्व गोरगरिबांचे घरगुती विज बिल घरपट्टी पाणीपट्टी 2019 2020 पर्यंतचा कर माफ होण्याकरता फलटण तालुका फलटण चे माननीय उपविभागीय दंडाधिकारी सो माननीय शिवाजीराव जगताप साहेब यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर आर पी आय ए फलटण तालुका अध्यक्ष संजय म गायकवाड व फलटण शहर अध्यक्ष महादेव रा गायकवाड यांच्यावतीने निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे गोरगरिबांच्या हाताला काम धंदा नसल्यामुळे गोरगरिबांचे हाल होत असल्यामुळे राज्य सरकारने या कोरोना महामारी covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता फलटण शहर व फलटण तालुक्यातील गोरगरिबांचे घरगुती तीन महिने व घरपट्टी पानपट्टी 2019 2020 चा कर राज्य सरकारने त्वरित माफ करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर माननीय श्री दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष व सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय ए तालुका अध्यक्ष संजय म गायकवाड फलटण शहर अध्यक्ष महादेव रा गायकवाड यांनी महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देण्यात आले