आसू /वार्ताहर (राहुल पवार)
– आसू ता. फलटण येथील तावसी रोड लगत दरवाजा उघडून झोपलेल्या घरात रविवारी रात्री चोरी झाल्याची घटना असून याप्रकरणी सोमवारी सायंकाळ अखेर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आसू येथील तावशी रोड लगत राहण्यास असणारे इमाम शेख हे आपल्या राहत्या घरात उन्हाळ्याच्या कारणाने गरम होत असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असता चोरट्यांनी डाव साधला व घरातील रोख रोख रक्कम तसेच ऐवज लंपास केले त्यामध्ये दोन तोळ्याची सोन्याची चैन, एका तोळ्याची अंगठी व तीस हजार रुपये रोखड नेहल्याची घटना रविवारी रात्री घडली. हा झालेला सर्व प्रकार लक्षात येताच बरड पोलीस ठाण्यात माहीत कळवली असता बरड पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले व झालेल्या घटनेचा पंचनामा केला. या चोरीच्या घटनेचा सोमवारी सायंकाळी अखेर गुन्हा दाखल झालेला नाही.