आसू ता. फलटण येथील रहिवासी असलेले अजिंक्य फुले यांची श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्यच्या प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
या निवडी चे पत्र नुकतेच संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड आणि प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या हस्ते देण्यात आले. अजिंक्य फुले याच संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीयध्यक्ष असताना विविध सामाजिक उपक्रम, शासकीय योजना समाजापर्यंत पोहचवून समाज बांधवांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून त्याच्या वक्तृत्वाला न्याय देत संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड आणि प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी त्याची प्रदेश प्रवक्ता पदावर निवड करून राज्यात काम करण्याची संधी दिलेली आहे. तसेच कृतिशील कार्य करणाऱ्या युवकाची निवड केल्यामुळे समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन आणि संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. राज्यावर निवड झाल्याने खूप मोठी जबाबदारी वाढली असून समाजबांधवांच्या समस्या, अडचणी या संघटनेच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे अजिंक्य फुले यांनी सांगितले आहे.