आसू येथे मुस्लिम बांधवांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करत रमजान ईद केली साजरी.

आसू – आसू पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करत रमजान ईद सारख्या पवित्र उत्सवाला एकत्र न येता बाहेर न पडता घरीच नमाजपठण करून प्रशासनाला सहकार्य करत रमजान ईद सारखा पवित्र सण मोठया आनंदाने साजरा केल्याचे दिसून येत आहे. मुस्लिम बांधव रमजान ईद सणाच्या निमित्त तीस रोजे पकडतात. रोजे संपल्यानंतर शेवटच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये नवीन कपडे तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी करून व गरजूंना मदत करून हा सण मुस्लिम बांधव साजरा करत असतात.
        याच रमजान ईद सणाचे औचित्य साधून आसू येथील अजमीर अब्दुल जकाते यांनी आपल्या वार्षिक उत्पन्नातून गरजू कुटुंबांना कोरोनाचा पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढे केला आहे. फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या हस्ते आसू गावातील गरजू कुटुंबांना अत्यावश्यक वस्तू किराणामाल तसेच भाजी मंडई यासारख्या वस्तूंचे किट बनवून वाटप करण्यात आले.
        या वेळीच फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सर्व मुस्लिम बांधवांना सद्याच्या परिस्थितीत “ईद मुबारक म्हणा पण हस्तांदोलन टाळा” असा संदेश देत सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. व रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा वापर करावा असे मत व्यक्त केले. या वेळी आसू ग्रामपंचायत सरपंच महादेवराव सकुंडे ग्रा.सदस्य धनराज घोरपडे, जमीर महात,मुन्ना शिरतोडे,जीवन पवार,धनंजय बोडरे व लतीफभाई शेख आदी उपस्थित होते
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!