बारामती: वार्ताहर अखेर पिंपळवंडी परिसरामध्ये कोरोना ने दस्तक दिली पिंपळवंडी फलटण टुडे वृत्तसेवा पिंपळवंडी येथील भटकळवाडी गावचे जावई श्री विश्वास पानसरे (मूळ रा. घोडेगाव) हे मागील १२ दिवसापासून त्यांचे पत्नीसह भटकळवाडी येथे सासू-सासर्यां कडे आले होते. गावी आल्यानंतर त्यांनी स्वतःला होमक्वारंटाईन करून घेतले होते. परंतु आज रोजी त्यांचे छातीत दुखू लागल्याने ते उपचार कामी सरकारी हॉस्पिटल ,आळे येथे गेले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले आहे. सदर मयत इसम हे मुंबई रेड झोन मधून गावी आल्याने डॉक्टरांनी त्यांना संशयित कोरोना मृत घोषित केले असून त्यांचा रिपोर्ट तपासणीकरिता पाठवला असुन त्यांच्या कुटुंबातील सासु व पत्नी यांनाही चेकअप कमी पाठवण्यात आले आहे .सदर मयत व्यक्तीचे भटकळवाडी येथील राहते घर हे ४ ही बाजूने बँरिकेटीग व रस्सी बांधून संपूर्ण परिसर हा सील करण्यात आला आहे .