बारामती:
कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासन – पोलिस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी करत असलेले उल्लेखनीय कार्य आहे व हेच खरे कोरोना योद्धे आहेत. कोरोना योध्ये दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत व सर्व नागरिकांचे रक्षण करित आहेत.या करोना विरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी बारामती अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय ,रुई ग्रामीण रुग्णालय येथे करोना योध्यांसाठी गिफ्ट्स अव्हेन्यू चे अभिजित बोरा , स्काय ऍग्रोचे केतन भोंगळे, योगेश राऊत ,युनिक ग्लासचे उमेश पांढरे पाटील यांचे वतीने फेस शील्ड व मास्क देण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व रुई ग्रामीणचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सुनील दराडे व डॉ.संजय घुले उपस्थित होते.
फेस मास्क व शिल्ड वितरण चे पत्र देताना चंद्रशेखर यादव