सातारा जिल्ह्यात 31 रुग्ण कोरोना बाधित

सातारा दि. 24 (जिमाका): सातारा जिल्ह्यात आज रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 31 रुग्ण कोरोना बाधित  असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अमोद गडीकर यांनी सांगितले. 
     कराड तालुक्यातील म्हासोली येथील निकट सहवासीत 30, 50 व 55 वर्षीय महिला, वर्षीय महिला, 65 व 25 वर्षीय पुरुष 9 वर्षाचे बालक.  शमगाव येथील  निकट सहवासीत 42 वर्षीय पुरुष. इंदोली येथील निकट सहवासीत 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय तरुण , 14 वर्षीय तरुणी व 12 वर्षाची मुलगी असे एकूण 11. 
  पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ पाटण येथील 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला व 2 वर्षाचे बालक असे एकूण 3. 
सातारा तालुक्यातील कारी येथील 24 वर्षीय तरुण 57 वर्षीय पुरुष. चाळकेवाडी येथील मुंबई येथून आलेली 35 वर्षीय महिला. मुंबई येथून आलेला माळ्याचीवाडी (कन्हेर) ता. सातारा येथील 27 वर्षीय युवक असे एकूण 4.
जावली तालुक्यातील केळघर येथील 12 वर्षीय बालक,53 वर्षीय पुरुष,16 वर्षीय तरुण व52वर्षीय महिला असे एकूण 4.
वाई तालुक्यातील आसले येथील निकट सहवासीत 49 वर्षीय महिला. वासोळे येथील निकट सहवासीत 8 वर्षीय बालक व 43 वर्षीय महिला. आसरे येथील 70 वर्षीय सारीचा रुग्ण व मुंबई येथून आलेला 67 वर्षीय पुरुषअसे एकूण 5.
महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील निकट सहवासीत 85 व 40 वर्षीय महिला असे एकूण 2
खटाव तालुक्यातील निमसोड  येथील मुंबई येथून आलेला 35 वर्षीय पुरुष एक.  
कोरेगांव तालुक्यातील वाघोली येथील निकट सहवासीत 56 वर्षीय महिला एक. 
असे एकूण 31 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 309 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 182  इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 120 आहे तर मृत्यु झालेले 7 रुग्ण आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!