आसू – (आनंद पवार)
फलटण व बारामती तालुक्याच्या सीमा जोडणाऱ्या व पूर्व भागातील अनेक कामगारांना व इतर कामासाठी येण्या-जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा गोखळी तालुका फलटण व मेखळी तालुका बारामती या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्या गोखळी पुलावरील वाहतूक सुरू होणार का याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती परंतु सध्या कोरोणाने सर्वत्रच धुमाकूळ घातला असताना व जिल्हा बंदी असल्याने गोखळीच्या फुलावर काटेरी झुडपे टाकल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती आज दुपारी फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप फलटणचे डीवायएसपी तानाजी बर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर हे यावेळी उपस्थित होते
फलटण व बारामती या तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून या कडे पाहिले जाते परंतु कोरोणाचे संकट वाढत असतानाच व जिल्हा बंदीचा आदेश असतानाच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार का याबाबत सर्वांच्या मध्येच संभ्रमावस्था आहे विशेष करून तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावातील युवक एमआयडीसीतील कामानिमित्त व इतर उद्योगासाठी बारामतीला जातात पण पूल बंद असल्याने या अडचणी वाढतच गेले आहेत या पुलावर वाहतूक सुरू केली तर जबाबदार कोण जबाबदारी कोण घेणार याबाबत सध्या समस्या निर्माण झाल्याने सध्या तरी गोखळीचा पूल काही दिवस बंदच राहणार असल्याचे समजत आहे
गोखळीचा पूल प्रशासनाने सुरु केल्यानंतर शेतकरी दुग्ध व्यवसाय व कामगार यांना हि येण्या जाण्या साठी परवानगी मिळावी अशी मागणी ही माजी सरपंच मनोज गावडे यांनी आपल्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले