सातारा दि. 21 (जिमाका) : जावली तालुक्यातील एक पुरुष 58 वर्षीय कोविड बाधित रुग्णाचा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज सकाळी मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेच्या तीव्र आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
वरळी, मुंबई येथून प्रवास करुन आलेली पाचगणी येथील 64 वर्षीय महिला गृह विलगीकरणात होती. या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्दयविकाराने मृत्यु झाला असून संशियत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले यांनी दिली आहे.
घाटकोपर, मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या 2 महिन्याचे बाळ कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे श्वास घेण्याचा त्रास होत होता म्हणून दाखल करण्यात आले होते. या 2 महिन्याच्या बाळाचा मृत्यु झाला असून संशयित म्हणून घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच नांदलापूर ता. कराड येथील 60 वर्षीय महिला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे संशियत म्हणून दाखल करण्यात आली होती. या महिलेचा मृत्यु झाला असून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.
146 जणांना अहवाल आले निगेटिव्ह
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 9, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 15 असे एकूण 111 जणांचे अहवाल निगेटिव्ह. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 35 जणांचे असे एकूण 146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
109 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
दि. 21 रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 87 असे एकूण 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 201 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 90 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 106 आहे तर मृत्यु झालेले 5 रुग्ण आहेत.