सातारा दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यात मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 अंतर्गत मंजूर केलेल्या अनुज्ञप्ती नमुना एफएल-3 अनुज्ञप्तीकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत त्यांन सीलबंद विक्री करण्यास परवानगी दिली आहे. राज्यात लागू असलेल्या कायद्यान्वये जारी केलेले लॉकडाऊनचे आदेश अस्तीत्वात कअसे पर्यंत लागू राहतील. या बाबत करावयाच्या कार्यवाहासाठी पुढीलप्रमाण मार्गदर्शक तत्व राहतील, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका आदेशन्वये कळविले आहे.
हे आदेश ज्या कार्यक्षेत्रात मद्यविक्री अनुज्ञप्ती कार्यरत राहण्यासाठी संबंधीत प्राधिकृत अधिकाऱ्याने परवानगी दिली आहे, त्या कार्यक्षेत्रात एफएल-3 अनुज्ञप्तीकरिता लागू राहतील. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) मधील अनुज्ञप्ती कार्यरत राहणार नाहीत. अनुज्ञेय असलेल्या ठिकाणी अनुज्ञप्ती कार्यरत राहण्याच्या वेळा सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत ठेवाव्यात. ही सवलत एफएल-3 अनुज्ञप्तीधारकास त्यांच्याकडील दि. 19 मार्च, 2020 अखेरीस असलेला मद्यसाठा संपेपर्यंत किंवा लाकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत लागू राहतील. एफएल-3 अनुज्ञप्तीधारकास त्यांच्या नुज्ञप्तीतील शिल्लक मद्यसाठा सीलबंद बाटलीतून फक्त”Off Consumption” साठी परवानाधारकास विक्री करता येईल. मद्यसाठा एमआरपी दराने विक्री करणे क्रमप्राप्त राहील व त्यावरील विक्रीकर (Composition Tax ) रितसर भरण बंधनकारक राहील.. एफएल-3 अनुज्ञप्तीधारकांनी परवानाधारकास अनुज्ञप्तीच्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास देऊ नये. अन्यथा आदेशाचा भंग मानला जाईल. संबंधित एफएल-3 अनुज्ञप्तीधारक विशेष पासान्वये बियरचा साठा एफएल/बीआर-2 अनुज्ञप्तीधारकांस एक वेळ विक्री करु शकेल. परंतु त्याकरीता एफएल/बीआर-2 अनुज्ञप्तीधारकांची मंजूरी असणे आवश्यक राहील. एफएल-3 अनुज्ञप्तीधारकास त्याच्या अनुज्ञप्तीतून शिल्लक मद्यसाठा सीलबंद विक्रीसाठी ही परवानगी दिलेली असून त्यांना नव्याने मद्यसाठा, हे आदेश लागू असे पर्यंत खरेदी करता येणार नाही.अधीक्षकांनी संबंधित एफएल-3 अनुज्ञप्तीधारकाकडील नमुना एफएनआर-3 व एफएलआर-3ए नोंदवहयांतील दि. 19 मार्च, 2020 रोजीच्या शिल्लक मद्याच्या नादी प्रत्यक्ष मद्य साठयाबरोबर तपासून घ्यावयाच्या आहेत व
अनुज्ञप्तीधारकास तेवढयाच मद्यसाठयाची विक्री करता येईल, मद्यसाठा विक्री होऊन संपल्यानंतर संबंधीत राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यास कळविणे अनुज्ञप्तीधारकावर बंधनकारक राहील. बिअरचा साठा मुदतबाहय झाला असल्यास अथवा त्याची प्रत खराब झाली असल्यास त्याची विक्री अनुज्ञप्तीधारकांनी करु नये. त्यांच्या कार्यक्षेत्रातील एफएल-3 अनुज्ञप्तीधारक नमुना एफएल-1 व एफएलाडब्ल्यु 1 अनुज्ञप्तीकडून नव्याने मद्य खरेदी करणार नाहीत याबबात दक्षता घ्यावी. तशा सुचना एफएल-1 व एफएल / डब्ल्यू 1 च्या प्रभारी अधिकाऱ्यास देण्यात येत आहेत. संबंधित एफएल-3 अनुज्ञप्तीधारकाकडे शिल्लक असलेल्या द्यसाठयाचीच विक्री करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत एफएल-3 अनुज्ञप्तीधारकाने घाऊक मद्यविक्रेत्याकडून अथवा एफएल-2
अनुज्ञप्तीधारकाकडून विना परवाना मद्यसाठा आणणार नाहीत याची दक्षता घ्यावी. एफएल-2 अनुज्ञप्तीमधून मद्यसाठा आणल्याचे निदर्शनास आल्यास, प्रकरणी चौकशी करून संबंधित एफएल-3/एफएल-2 अनुज्ञप्तीविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. मद्यविक्री करताना कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेणे अनुज्ञप्तीधारकाची जबाबदारी राहील. एफएल-3 अनुज्ञप्तीधारकास त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना आपत्ती निवारण, चोख स्वच्छता राखणे व कोव्हीड संदर्भात इतर बाबतीत उदा. आरोग्य सेतु अॅपचा वापर याबाबत सखोल प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अनुज्ञप्तीधारकाची राहील.
14. एफएल-3 अनुज्ञप्तीधारकाने गर्दी, संपर्क व संसर्ग टाळण्याच्या दृष्टकोनातून मद्यखरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये व अनुज्ञप्तीच्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्ती/कामगारांमध्ये Social /distancing, Mask व वेळोवेळी Sanitization बाबत शासनाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. . यापैकी कोणत्याही शतीचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद, 2005, साथीचे रोग कायदा, 1897, भारतीय दंड संहिता कलम 188 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा मधील तरतुदीन्वये कारवाईस संबंधित अनुज्ञप्तीधारक पात्र राहील. या आदेशात नमुद केलेल्या शर्तीनुसार नमुना एफएल-3 अनुज्ञप्तीकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत अथवा लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत त्यांना सीलबंद बाटलीतुन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात येत आहे.