अकरा जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह, त्यात 18 तारखेला मुंबई वरून आल्यानंतर मृत्यू पावलेल्या व्यक्तींचाही समावेश

सातारा दि. 20 (जिमाका) : आज रात्री प्राप्त अहवालानुसार क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 4 (  चिंचनेर लिंब ता.सातारा येथील मुंबई वरून आलेला 30 वर्षीय युवक, गादेवाडी ता. खटाव येथील 30 व 32 वर्षीय पुरुष तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाच्या निकट सहवासातील 9 वर्षाची मुलगी)  , वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 3 ( म्हासोली ता. कराड येथील 22 वर्षीय युवती  व 28 वर्षीय पुरुष तसेच मेरुएवाडी येथील 33 वर्षीय पुरुष), उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 (कोळकी येथील 74 वर्षीय पुरुष व फरडवाडी, ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष), ग्रामीण रुग्णालय, वाई येथे कवठे ता. खंडाळा येथील 33 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल म्हासोली ता. कराड येथील  50 वर्षीय निकट सहवासित अशा  एकूण 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी फलटण येथील 74 वर्षीय पुरुषाचा 18 रोजी मुंबई वरून प्रवास करून आल्यानंतर  मृत्यू झाला होता त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

            जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 181 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 79 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 4 रुग्ण आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!