पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे .
तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत अ त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तहात’ शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. नेताजी पालकर यांच्या कडे काही दिवस किल्ल्याची जबाबदारी होती.
गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळी व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजूस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.
तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर जाण्यासाठी.
मार्ग पुणे – जवण नं.1 बस घेउन गडाच्या पायथ्याशी जाता येते किंवा कामशेत-कालेकॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.तिकाेणा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना ही काळजी घ्या – किल्ला चढताना ग्रिप असलेल्या शुजचा वापर करा. शक्यताे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परीधान करावे. – साेबत पाण्याची बाटली आणि फस्ट एड किट बाळगा. माहिती असलेल्या तसेच किल्लावर दर्शविलेल्या वाटेवरुनच किल्ल्यावर चढाई करा. अन्यथा वाट चुकण्याची शक्यता असते. अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका असताे, त्यामुळे माहीती असलेल्या वाटेनेच जा. साेबत प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खाण्यास काही नेले असल्यास त्याची वेष्टण बॅगेत भरुन परत घेऊन या. गडावर कुठेही कचरा करु नका.