इयत्ता १ली ते ७वी( सेमी इंग्रजी) प्रवेश सन २०२०-२०२१
सध्या सर्वज्ञात *कोरोना प्रादुर्भाव संचारबंदी* असलेने आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी या प्रशालेने *आॅनलाइन* प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. प्रवेश निश्र्चित करणेसाठी खालील लिंकवर दिलेला अर्ज बिनचूक भरावा
*सूचना*—
*अ)* प्रवेश मर्यादित असलेने क्रमाने येणा-या अर्जानूसार आपला प्रवेश निश्चित होईल,तरी लवकरात लवकर आॅनलाइन अर्ज भरावा
*ब)* कोरोना लॉकडाऊन संपले नंतर शासन आदेश मिळाल्यावर पालकांनी इयत्ता १ली साठी जन्मतारीख दाखला व आधारकार्ड च्या झेरॉक्स शाळेत जमा करणे आवश्यक आहे.
*क)* इयत्ता २री ते ७वी साठी कोरोना लॉकडाउन संपलेनंतर शाळा सोडलेचा दाखला शाळेत जमा करणे आवश्यक आहे.
*ड)* यापूर्वी शाळेत दाखल असणा-यांनी हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही
*इ)* *महत्त्वाचे* इयत्ता १ ली साठी श्रीमंत निर्मला देवी बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन उर्वरित जागांसाठी इतर विद्यार्थ्यांचा विचार होईल तसेच इ.५ वी साठी याच शाळेतील ४थी च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल
*वैशिष्ट्यपूर्ण बाबी*
१) उपक्रमशील शाळा असा नावलौकिक
२)ज्ञानरचनावाद युक्त शिक्षण
३) खेळासाठी खास स्वतंत्र शिक्षक
४)ई-लर्निंग बरोबरच संगणकाचे स्वतंत्र तास
५)बाह्य स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत सहभाग व नावलौकिक
६) प्रवेशासाठी नेहमीच पालकांचा आग्रह
टिप – आवश्यक प्रवेश संख्येची नोंद झालेनंतर ही लिंक बंद होईल तरी लवकरात लवकर लिंकवर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा
घरी रहा, सुरक्षित रहा, व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या,, लवकरच भेटूया