बारामती:वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, डॉक्टर , सफाई कर्मचारी यांच्या बरोबरीने एसटी चे कर्मचारी सुद्धा काम करीत आहे दरम्यान एसटी तर्फे आता परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडवण्याच्या साठी बारामती एमआयडीसी आगारातील सर्व चालक कार्यरत आहेत आगार व्यवस्थापक गोविंद जाधव व कर्मचारी अहोरात्र नियोजन करीत आहेत. या कार्याची दखल घेऊन यादगार फौंडेशन चे अध्यक्ष फिरोज बागवान यांनी बारामती एमआयडीसी आगारात चालकां साठी व कार्यशाळा मधील यांत्रिकी कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप केले यादगार सोशल फौंडेशन च्या वतीने वाटप करण्यात आले या वेळी , स्थानक प्रमुख घनश्याम शिंदे , वाहतूक निरीक्षक पांडुरंग बाचल , वाहन परीक्षक विजय खरात , चालक आडागळे , चालक महेश दडस, चालक विशाल शेवाळे व आदी मान्यवर उपस्तीत होते. प्रवाशांची सेवा करताना योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान फिरोज बागवान यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहक नितिन भागवत यांनी केले
तसेच आभार घनश्याम शिंदे यांनी मानले