बारामती:वार्ताहर
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या तपासणीची प्रयोगशाळा व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू होता पुण्याच्या प्रयोगशाळा वर असलेला कमालीचा ताण कमी करून तातडीने अहवाल प्राप्त करण्यासाठी पुण्यासह जिल्ह्यात एका ठिकाणी अशी प्रयोगशाळा उभारणे गरजेचे होते त्यातून बारामतीच्या प्रयोगशाळेत आता कोरोना तपासणीची सोय झाली आहे.
याबाबत बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कुमार तांबे यांनी पुढील माहिती दिलेली आहे “बारामतीत दोन प्रणाली द्वारा तपासणी केली जाणार आहे सीबीनॅट’ मशीन
या मशीनद्वारे आजपासून या तपासणीत प्रारंभ झाला आहे येत्या सात दिवसात पीसीआर या मशीनद्वारे तपासणी होणार आहे त्यातील घशातील द्रवाचे नमुने तपासणी केली जाणार आहे त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे या मशीनच्या द्वारे आपण पॉझिटिव्ह अहवाल आला तर पुढील उपचार करणे आता सोयीचे होणार आहे सदर मशीन प्राप्त होण्यासाठी अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री आम्ही अध्यक्ष देशमुख वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सचिव डॉक्टर संजय कुमार मुखर्जी वैद्यकीय संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी या प्रयोगशाळेसाठी विशेष मदत केली
बारामतीत तालुक्याच्या ठिकाणी ही सुविधा सुरू झाल्याने पुणे या ठिकाणाचा आता ताण कमी होणार असून अहवाल 2 तासात प्राप्त होणार आहे.त्यामुळे कोरोना तपासणी साठी बारामती महत्वाचे ठिकाण झाल्याने बारामती तालुक्यासह सातारा,नगर, सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना सुद्धा आता फायदा होणार आहे