आसू/वार्ताहर – राहूल पवार
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ पुत्र, स्वराज्याचे पहिले व मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 363 व्या जयंतीनिमित्त धर्मवीर संभाजीराजे युवक प्रतिष्ठान आसू यांच्यावतीने छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे व आऊसाहेब जिजाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजीराजे यांची 363 वी जयंती साजरी केली. यावेळी धर्मवीर संभाजी राजे युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.