बारामती: वृत्तसेवा बारामती एमआयडीसी येथील सह्याद्री ऍग्रो अँड डेअरी प्रा ली कंपनीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस (कोविड-19) एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला सदर मदत शुक्रवार दि.8 मे रोजी देण्यात आली.
सह्याद्री ऍग्रो अँड डेअरी प्रा ली ही कंपनी राज्यात विविध जिल्यामध्ये दूध संकलन व शीतकरण आणि दूध पुरवठा क्षेत्रात कार्यरत आहे.कंपनीच्या सर्व अधिकारी,कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या वतीने एक दिवसाचा पगार एक लाख रुपये जमवून सदर धनादेश बारामती चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला या प्रसंगी कंपनीचे अधिकारी उपस्तीत होते.