बारामती: वृत्तसेवा कोरोना वर जो पर्यंत प्रभावी लस मिळत नाही तो पर्यंत कोरोना बरोबर लढायचे आहे त्यामुळे स्वतःला समाजात मिसळताना कोरोना बरोबर लढाई ची सवय ठेवा असे प्रतिपादन बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. देसाई इस्टेट मधील श्री गणेश तरुण मंडळ च्या वतीने कोरोना योध्याचा सन्मान व नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप प्रसंगी कोरोना सोल्जर्स ला मार्गदर्शन करीत होते.या प्रसंगी नगरपरिषद च्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे,शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,
स्थानिक नगरसेवक इम्तियाज शिकीलकर,जळोची चे माजी सरपंच छगन आटोळे,न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे,बाळासाहेब वायसे,आदी मान्यवर उपस्तीत होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर सोशल डिस्टनिग चे नियम पाळून व्यवहार करा असेही औदुंबर पाटील यांनी सांगितले.या वेळी मान्यवरांनी कोरोना विषयी मार्गदर्शन केले.या वेळी पोलीस अधिकारी ,कर्मचारी व आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे,आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व सफाई कर्मचाऱ्यांचा मास्क व सॅनिटायझर देऊन सन्मान करण्यात आला.लॉकडाऊन च्या काळात गरजूना धान्य,किराणा,भाजीपाला घरपोच केला आहे. विविध क्षेत्रातील कोरोना योध्याचा सन्मान व सॅनिटायझर,मास्क वाटप हे कोरोना असे पर्यंत कार्य देसाई इस्टेट च्या वतीने सुरू राहणार असल्याचे नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ अनिता घुले यांनी केले या वेळी आठशे कुटूंबियांना मोफत सॅनिटायझर,मास्क,कोरोना मार्गदर्शन पुस्तिका वाटप करण्यात आली.