फलटण (प्रतिनिधी) – कोरोना कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर गेली दिड महिना लाॅकडाऊन जाहीर केला आहे. लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे बरेच जण परगावी अडकलेले आहेत, त्यांना घराकडे जाण्याची इच्छा आहे, परंतु जाता येत नाहीये अशा नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार हेल्पलाइन तयार करण्यात आलेली आहे.
फलटण तालुक्यातील अथवा सातारा जिल्ह्यातील कोणाचे नातेवाईक अथवा घरातील व्यक्ती जिल्ह्याच्या, राज्याच्या बाहेर असल्यास ताबडतोब या हेल्पलाईनला कळवावे, नागरिकांना स्वगृही येण्यासाठी काही अडचणी येत असतील तर या हेल्पलाईनद्वारे त्या अडचणी सोडवल्या जातील असे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कळविले आहे.
आपण जर सातारा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणार असाल अथवा परराज्यात जाणार असाल तर https:// covid19.mhapolice.in या लिंक वरून ऑनलाइन अर्ज दाखल करावा व अर्जासोबत खाजगी अथवा सरकारी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ई-पास प्राप्त करूनच आपणाला परजिल्ह्यात अथवा परराज्यात प्रवेश करता येणार आहे.
आपणास परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून सातारा जिल्ह्यामध्ये यावयाचे असेल तर आपण ज्या जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये असाल तेथील कोव्हिड १९ हेल्पलाईन नंबर मिळवून आपण तेथून फॉर्म भरून सातारा जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास उपलब्ध करून घेऊ शकता.
वरील ई- पास मिळवित असताना आपणास एखादी अडचण निर्माण झाली किंवा आपण केलेल्या अर्जाला प्रतिसाद मिळत नसेल तर खालील मोबाईल नंबर अथवा खालील हेल्पलाईन वर संपर्क साधावा.
हेल्पलाईन नंबर-१०७७
दादासाहेब चोरमले
९९२२३९२९४६,
सचिन रणवरे
९८५०१७३४२९,
हर्षद वाबळे
७२६२००६६७०,
अभय यवळकर
८००७९०२१४५,
ॲड.रोहित अहिवळे
९९६०८८५००७,
सचिन फडतरे
९८२३३०१०००,
प्रशांत नाळे
९९७५९४३०३,
शुभम नलवडे
९६६५५७९४४१,
सिद्धेश माने
८८०६९२४६७१