बारामती:वार्ताहर बारामती शहरातील पंजाबी समाज बांधवा कडून वणवे मळा येथील गुरुद्वार मध्ये रोज 250 लोकांना मोफत जेवणाची सोय (लंगर ) करण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या कालावधीत रोज एक वेळा बंद पाकिटातून तयार केलेले अन्न बारामती शहरातील विविध ठिकाणी असणारे मंदिर,मस्जिद च्या बाहेर बसणारे भिक्षुक,रस्त्यावरील भिक्षुक ,एसटी स्टँड,रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी असणारे बेवारस व्यक्ती,आणि गरजू लोकांना सदर अन्न पाकिटे देण्यात आली. 11 मे रोजी शहरातील लॉकडाऊन शिथिल होणार च्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या हस्ते अन्न पाकिटे देण्यात आली.सदर जेवणाची व्यवस्था करताना पंजाबी समाज बांधवांनी सढळ हाताने मदत केल्याने रोज 250 लोकांना रोज एक वेळचे जेवण बंद पाकिटातून देने शक्य झाले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान व जाण जपत सदर मदत केल्याचे बारामती पंजाबी समाज सेवा संघाच्या वतीने सांगण्यात आले.