कापूरहोळ ( प्रतिनिधी)–विठ्ठल पवार.
भोर तालुक्यातील राजापूर येथील संजय बोबडे या एका आदर्श शेतकऱ्यांने मोजक्या वऱ्हाडीच्या उपस्थितीत आपल्या कन्येचा विवाह उरकून यावर होणारा खर्च टाळून कोव्हीड सेंटर,भोर चे तहसीलदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपयांची मदत प्रशासनास केली आहे.समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
भोर तालुक्यातील राजापूर येथील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त संजय बोबडे यांची कन्या रुचिता हीचा विवाह खंडाळा जि. सातारा येथील पळशी गावचे रहिवासी असणारे संजय भरगुडे यांचे चिरंजीव गिरीष याच्याशी 5 मे 2020 रोजी अत्यन्त साधेपणाने सोशल डिस्टन्स चे पालन करून संपन्न झाला.
लग्न शाही पद्धतीने करू असं म्हणून अनेक शेतकरी या विवाह तारखा पुढे ढकलत आहेत. याचा विचार न करता राष्ट्रीय आपत्तीत बोबडे परिवाराने विवाह अत्यंत साधेपणाने केला असून राष्ट्रीय आपत्ती मदत कार्यास 25 हजार रुपयांचा निधी भोरचे तहसीलदार अजित पाटील यांच्याकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
या विवाह सोहळ्यास नितीनकुमार भरगुडे पाटील
माजी उपाध्यक्ष जि. प सातारा ,शैलेश सोनवणे, अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष भोर तालुका ,
विठ्ठल आवाळे सदस्य आणि गटनेते जिल्हा परिषद पुणे, रोहनदादा बाठे सदस्य पंचायत समिती भोर, मठाधिपती जाधव महाराज तसेच पोलिस पाटील, राजापूर व दोन्ही गावचे सरपंच उपस्थित होते.