फलटण : येथील वाठार निंबाळकर येथील विटभट्टीवर कामाला असणाऱ्या मजुराच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी राजशेखर बाबुराव झळके, रा . मडीयाल ता आळंद जि कुलबर्ग सध्या रा – वाठार निंबाळकर ता . फलटण हे त्यांची पत्नी सौ शिल्पा , मुलगी संजना यांच्या समवेत विलास ज्ञानेश्वर कुंभार रा वाठार निंबाळकर ता फलटण यांचे विटभट्टीवर कामावर आहेत. दि .7 रोजी सकाळी विट भट्टीवरून काम करून घरात नाष्टा करण्याकरीता आले . त्यावेळी पत्नी सौ शिल्पा ही स्वयंपाक करीत होती . त्यावेळी मुलगी संजना ही साडीने बांधलेल्या झोक्यात झोपलेली होती . मुलगी अचानक परतुन खाली पडली व रडू लागल्याने फिर्यादी याने मुलगी संजना हिस उचलुन घेवुन पत्नी शिल्प हिस शिवीगाळ केली . त्यानंतर पत्नी शिल्पा ही मुलीचे सेरेलेक्स संपले आहे असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांने मुलगी संजना हिला शेजारी असणाऱ्या व्यक्तीकडे देऊन सेरेलेक्स आणण्यासाठी गेले असता मेडिकल बंद असल्याने सकाळी 9:45 वाजण्याच्या सुमारास घरी असता फिर्यादी यांस घराचे दार लावलेले दिसले त्यानंतर घराचे दार वाजवुन हाका मारल्या असता शिल्पा हिने दार उघडले नाही व तिचा आवाज आला नाही म्हणून फिर्यादी व शेजारी रहाणारा सुनिल बल हे दोघे घरावर चढुन घराचा पत्रा उचकटून पाहिले असता शिल्पा हिने घरातील लाकडी वाशाला साडी बांधुन गळफास घेवुन तिचे पाय जमिनीला टेकलेले दिसले यानंतर दोघांनी मिळुन घराच दार तोडले व लाकडी वाशाला बांधलेली साडी सोडुन शिल्पा हिस जमिनीवर झोपवले . त्यावेळी शिल्पा ही मयत झालेली होती असे फिर्यादी यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.