कोळकी( वार्ताहर) –अगस्त्या विज्ञान केंद्र,डाएट फलटण यांच्यामार्फत लॉकडाऊनच्या काळात विज्ञान डिजिटल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या विज्ञान युगामध्ये विज्ञान संकल्पनेची सांगड घालणारी अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था 19 राज्यात कार्यरत आहे. यासंस्थेद्वारे सध्या देशभरात विज्ञान प्रयोगविषयक डिजिटल कॅम्प राज्यातील विविध जिल्हयात सुरु आहे.
अनुभवातून शिक्षण, शिक्षकांना प्रशिक्षण या माध्यमातून विविध वैज्ञानिक उपक्रम संस्थे मार्फत वर्षभर चालू असतात.
याच उददेशाने अगस्त्या विज्ञान केंद्र डाएट फलटण यांच्यामार्फत विज्ञान डिजिटल कॅम्प सुरू केला आहे. यामध्ये विदयार्थ्यांना अगस्त्या मार्गदर्शक व्हॉटसॲप ग्रुपद्वारे , गुगल क्लासरूम, गुगल फॉर्म या माध्यमाद्वारे विज्ञान विषयक माहिती पुरविण्यात येते आहे.
सर्व विदयार्थ्यांनी कृती करून पाहावी आणि आनंद घ्यावा. सध्या लॉकडाऊन च्या काळात अभ्यास थांबू नये म्हणून दररोज ऑनलाईल विज्ञान प्रयोग व उपक्रम हे विज्ञान व घरातील साहित्यावर आधारीत आहेत. यात दाब संकल्पना, श्वसनसंस्था, आम्ल , आम्लारी व क्षार , ध्वनी , प्रकाश, अस्तिसंस्था, चेतासंस्था, या विषयांचा समा वेश करण्यात आला आहे.अगस्त्या केंद्राचे विरकुमार वसेकर यांचे मार्गदर्शन होत आहे. विदयार्थी स्वत: कृती करून आनंद घेत आहेत.