बारामती वृत्तसेवा :…. दौंड तालुक्यातील वन्य प्राण्यांची जनगणना करण्याचे आयोजन करण्यात आले असले तरी या ला करोना संसर्जन्य साथीचे अडचण निर्माण झाली आहे. रात्री ही मोहीम हाती घेण्याचे योजिले असले तरी या मध्ये वनविभागाचा अधिकारी आणि कर्मचारी वितिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीचा सहभाग राहणार नाही . अशी माहिती दौंड वनविभागाचे प्रमुख महादेव हाजारे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेली अधिक माहिती अशी की दौंड तालुक्यात अकराशे हेक्टर जमीन वनविभागाची आहे .त्यातून पाचशे हेक्टर जमीन शेतकऱ्यांना वाटप केली गेली असून सहाशे हेक्टर वरती जंगल आहे. शासनाने वन्य प्राण्यांची जनगणना करण्याचे आदेश जारी केले असून करोना साथीच्या आजाराला लक्षात घेऊन हे काम करताना कर्मचारी अधिकारी सोडून कोणत्याही अन्य व्यक्तीला या मध्ये समाविष्ट करायचे नाही असा आदेश पारित केला आहे . या मोहिमेत प्राणीमित्र आवडीने सहभागी होण्यासाठी इच्छुक असतात मात्र यावेळी त्याना सहभागी होता येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे .