बारामती- वार्ताहर
मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा व समाजसेवक स्वर्गीय भाऊसाहेब मांढरे मित्र मंडळ बारामती यांच्यावतीने बारामती व इंदापूर तालुक्यातील गरजवंत गोरगरिबांना धान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू भाऊसाहेब मांढरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्यावतीने तीनशे गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू ,मास्क त्याचबरोबर धान्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू ,तांदूळ, साखर ,तेल साबण, चहा पत्ती, आधीचे वाटप करण्यात आले. सदरील जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे गरजवंतांनी स्वागत केले. अडचणीच्या काळात मदतीला धावून आल्याबद्दल संघटनेचे मनापासून आभार मानून सदरील स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले. सदरील कार्यक्रमाचे नियोजन इंदापूर तालुका अध्यक्ष दिलीप सोनवणे, बारामती तालुका अध्यक्ष शिवाजी सोनवणे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश आढागळे, तांदूळवाडी शाखा अध्यक्ष माणिक आडगळे, सामाजिक कार्यकर्ते व संघटक संजय साठे, ॲडव्होकेट अमृत नेटके, पत्रकार बापूराव शेंडगे, धोंडीबा आडगळे, शिवाजी आडागळे, लक्ष्मण खंडाळे, आदींच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, संघटनेचे कार्याध्यक्ष पुणे मनपा नगरसेवक अविनाश भाऊ बागवे, यांच्या या आदेशानुसार समाजातील अत्यंत गरीब व लॉक डाऊन मुळे हालाखीचे जीवन जगत असलेल्या लोकांना छोटासा मदतीचा हात या चांगल्या भावनेतून सदरील वाटप करण्यात आले असून आगामी काळात संघटनेचे आदेशानुसार इतर अनेक कार्यक्रम उपक्रम राबवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजू मांढरे यांनी साप्ताहिक बहुजन हे तर शी बोलताना सांगितले.