कृषि उत्पन्न बाजार समिती फलटणमध्ये भुसार मार्केट,डाळींब मार्केट नेहमीप्रमाणे सुरु राहील:- सोनवलकर सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण

        

फलटण : फलटण तालुक्यातील शेतकरी,अनुज्ञप्तीधारक अडते खरेदीदार हमाल आणि मापाडी यांना कळविणेत येते की,आरोग्य सेवेत काम करणाऱ्या एका नर्स चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
 मौजे जाधववाडी हद्दीमधील बिरदेवनगर, फलटण शहर हद्दीतील संजीवराजेनगर, भडकमकरनगर परिसरामध्ये Containment Zone व परिसरातील फलटण शहर, कोळकी, ठाकुरकी या ठिकाणी बफर क्षेत्र घोषीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कंटेंन्मेंट झोन व बफर झोन जाहीर झालेल्या क्षेत्रातील लोकांना पुढील निर्णय होईपर्यंत मार्केट यार्ड फलटण येथे प्रवेश प्रतिबंधित करणेत येत आहे.
भुसार मार्केट,डाळींब मार्केट नेहमीप्रमाणे सुरु राहील.इतर राज्यात जाणाऱ्या तसेच तिथून मार्केट मध्ये येणाऱ्या गाड्याचे लोडिंग,अनलोडिंग सुरु राहील.खरेदीदार मर्यादित असलेने व कोरोना रुग्ण आढळून आलेने विशेषतः भाजीमंडई चे व्यवहार मर्यादित स्वरुपात राहतील.संबंधित शेतकऱ्यांनी,वाहतुकदारांनी त्या बेतानेच शेतमाल आणावा व अडत्यानी सर्व संबंधितांना अवगत करावे म्हणजे गैरसोय होणार नाह सचिव सोनवल कर कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!