फलटण:फलटण शहर व परिसरामध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमण काळामध्ये आपण शहर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी व शेतकरी बांधवांचा शेतमाल या महामारी च्या काळामध्ये पडून राहून नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांच्या सहकार्याने अत्यंत उत्कृष्टपणे राबवत आहोत. अत्यंत चांगला प्रतिसाद ग्राहक राजाने या संकल्पनेला दिला आहे त्याबद्दल आपल्या ग्राहकराजा चे शतशः आभार.
वरील काम सुरू असताना असे निदर्शनास आले की सर्वच ग्राहक शेतमाल भाजीपाला व इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी शेतावर किंवा बाजारात येण्यासाठी अडचण येत आहे. कारण आपणास शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन कुठल्याही परिस्थितीमध्ये करण्याचे आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सोशल डिस्टन्स आपल्याला पाळावयाचा आहे. म्हणून आपणा सर्वांच्या सोयीसाठी कृषी क्रांती ग्रुप च्या मार्फत वरील दिलेला भाजीपाला आपणास घरपोच देण्याची व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. येणाऱ्या गुरुवार दि. 7/5/2020 रोजी वरील भाजीपाला शेतकरी बांधवाच्या शेतामधून थेट आपणापर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. यामध्ये सर्व प्रकारची खबरदारी घेऊन भाजीपाला ताजा,स्वच्छ व कमीत कमी हाताळणी केलेला आपणास देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तरी आपण आपल्या भागातील परिसरातील किंवा अपार्टमेंटमधील जास्तीत जास्त ग्राहकांनी एकत्रितरीत्या मागणी दिल्यास आपणास वरील भाजीपाला किट आपणापर्यंत पोचवणे सोपे होईल. यामुळे या अडचणीच्या काळात बळीराजाला आपल्या मार्फत ही एक प्रकारची मदत होणार आहे. तरी आपणास विनंती आहे की वरील मेसेज आपले सर्व मित्र मंडळ यांना तसेच आपले भागातील सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करून शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी व व बळीराजाला या अडचणीच्या काळामध्ये मदत करण्यासाठी आपणाकडून सहकार्य व्हावे ही विनंती.
———————————————–