फलटण : सोलापूर जिल्ह्याचे युवक नेते व माजी खासदार रणजीत सिंह मोहिते-पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी अशी आग्रहाची मागणी पक्षश्रेष्ठींच्या कडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये मोहिते पाटील कुटुंबीयांनी प्रवेश केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करण्यामध्ये व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणणे मध्ये सिंहाचा वाटा मोहिते पाटील कुटुंब याचा आहे.तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सुद्धा आज भारतीय जनता पक्षाच्या विचाराच आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी व पक्षाला बळकटी मिळण्यासाठी युवा नेते रणजीतसिह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळावी .यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे .पक्षश्रेष्ठी यावर योग्य विचार करतील अशी आशा मला यानिमित्ताने वाटते असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.