फलटण शहर व आसपासचा ग्रामीण भागातील परिसर कोरोना मुक्त राहण्यासाठी* भविष्यातही आपण फलटण नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी *मा. श्री. प्रसाद काटकर* यांनी केले आहे.

फलटण शहर व फलटण शहराच्या परिसरातील कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, ठाकुरकी या भागातील सर्व मिळून लोकसंख्या जवळपास
*१ लाखाच्या* दरम्यान आहे. आजपर्यंत आपणा  सर्व नागरिकांच्या, जनतेच्या सहकार्याने फलटण शहर व आसपासच्या परिसरामध्ये *कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊन दिला* नाही. हि बाब निश्चितच आपल्या दृष्टीने अभिमानास्पद अशीच आहे. 
         यापुढे ही आपले *फलटण शहर व आसपासचा ग्रामीण भागातील परिसर कोरोना मुक्त राहण्यासाठी* भविष्यातही आपण फलटण नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी *मा. श्री. प्रसाद काटकर* यांनी केले आहे.
          ते पुढे म्हणाले की कोरोना या संसर्गजन्य आजाराचा संसर्ग केवळ आणि केवळ एकाच कारणा मुळे  होऊ शकतो ते म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये, परिसरामध्ये, भागांमध्ये, गल्लीमध्ये तसेच शेजारी जर कोणी व्यक्ती नव्याने बाहेरून पुणे, मुंबई, नागपुर, सोलापूर, कराड, पिंपरी, चिंचवड इत्यादी बाधित क्षेत्रातून आला असेल तर त्याचा धोका आपल्या कुटुंबाला तसेच शेजारील व्यक्तींना होऊ शकतो.
       म्हणून आपले कुटुंब आपला परिसर व आपली गल्ली सुरक्षित व कोरोना मुक्त राहण्यासाठी आपल्या कुटुंबात, परिसरामध्ये, गल्लीमध्ये तसेच शेजारी जर का कोण नवीन व्यक्ती बाधित क्षेत्रातून आलेली आपल्या निदर्शनास आले. तर सुजान नागरिकांनी ताबडतोब  फलटण नगरपरिषदेच्या खालील अधिकाऱ्यांची संपर्क करावा. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे शेवटी *प्रसाद काटकर* यांनी सांगितले आहे.
संपर्क
 *श्री. विनोद जाधव* 9860850350 
*श्री. संतोष काकड़े* 8007891524
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!